रविवार 8 मे 2011

वाघोबाची मावशी

नमस्ते , आज ब्लॉग कोणत्या विषयावर लिहावा हा विचार करत असताना मला अचानक माझा अत्यंत आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय आठवला तो म्हणजे 'वाघोबाची मावशी ' अर्थात मांजर .मांजर हा आमच्या घराचा अविभाज्य घटक आहे .मी जन्मल्यापासून तर मांजर आमच्या घरात आहेच पण त्याही आधी २० वर्ष म्हणजे जवळपास गेली ४० वर्ष मांजर माझ्या वडिलांचा आवडता पाळीव प्राणी असल्या कारणाने सतत आमच्या घरात आहे
       आता पर्यंत कितीतरी मांजर आली आणि गेली पण आमच्याकडच्या मांजराचे नाव कधीही बदलले नाही जर मांजरी  असेल तर 'मनी' आणि बोका असेल तर 'बोक्या'. मी माझ्या आई आणि वडिलांकडून ऐकलेले (माझा जन्म होण्या आधीचे ) मांजराचे काही किस्से सुरवातीला लिहितोय .एक मांजर अस होत जे माझे वडील ऑफिस मधून   आले की टुणकन त्यांच्या खांद्यावर उडी घेत असे. आणि विशेष म्हणजे हे मांजर माझ्या वडिलांच्याच ताटात एका बाजूला काढून ठेवलेला भात किवा चपातीचा तुकडा खात असे आणि माझी आई दररोज त्याला बास्केट मध्ये ठेऊन फिरून आणत
.                                                                                                                    आता मी पाहीलेल्या पहिल्या मांजराबद्दल ते मांजर थोडस विचित्रच होत ते आश्या साठी  की तेंव्हा  मी दीड -दोन वर्षाचा असेन मी टीव्ही पाहत बसलेला असताना (टीव्ही पाहण्याची आवड मला लहानपणापासून आहे हे यावरून दिसत ) ते मांजर अचानक मागून येऊन त्याच्या पुढच्या दोन पायाने माझ्या मानेला धरून मला  मागे डोक्यावर पाडत असे (ही अतिशयोक्ती वाटत असली तरी हे खर आहे ) आणि हे मांजर सश्या सोबत चक्क खेळत असे . पुढे माझ्या वडिलांची दुसऱ्या गावाला बदली झाली आणि ते मांजर तिथेच राहीले
.       नंतर ही आम्ही अनेक मांजर पाळली आणि त्यांना पिल्ले देखील झाली . त्यातल्याच एका पिल्लाला लहान असताना पहिले काही महिने मागच्या दोन पायावर चालता येत नसे पण नंतर काही दिवसांनी कोणत्याही विलाजाशिवाय ते मांजर व्यवस्थित चारही पायावर चालू लागले .त्याच्या आईच्या चाटन्यानेच बहुतेक ते  बरे झाले आसवे
        आणखी एका बोक्याचा अतिशय मजेदार अनुभव आहे . तो बोक्या मी पहिलीत असताना आमच्या घरी होता मी तीन चाकी सायकल वर बसून शाळेत जात असे आणि माझी आई मला शाळेत सोडायला  यायची तर माझ्या आई सोबत तो बोक्या देखील मला शाळेत सोडायला यायचा तो माझ्या   सायकल समोर गडबडा लोळत येत असे आणि मला शाळेत सोडल्यावर माझ्या आई सोबत माघारी येत असे . एकदा हा बोकोबा काही माघारी माझ्या आई सोबत आलाच नाही . मग जेव्हा माझी आई मला शाळेतून माघारी नेण्यासाठी आली तेव्हा हा बोक्या बरोबर माझ्या शाळेच्या दारात बसला होता व तो पुन्हा माघारी घरी आला.
ह्या बोक्याच आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे  हा बोक्या त्याच्या आईच्या अनुपास्तितीत आपल्या धाकट्या भावंडांची अगदी आई सारखी काळजी घेत असे . 
           आमच्या मनीला झालेल्या पिल्लांपैकी बरीच पिल्ले आम्ही आमच्या ओळखीच्या  लोकांना देखील दिली त्यातलंच एक पिल्लू आम्ही माझ्या वडिलांच्या  ऑफिस मधील सहकार्याला दिले .त्याला त्यांनी अगदी थाटात सांभाळले .त्याच्यासाठी त्यांनी  थर्माकोलच  छोटस घर देखील बनवल मला अजूनही आठवतंय त्यांनी तीच नामकरण 'रुबी' अस केल ती मनी थाटात नक्की राहायची पण मांसाहारी पदार्थ खाण तर सोडा ती त्याकडे पाहत देखील नसे .  
    सगळीच मांजर    काही माणसांच्या सवयीची नसतात अशीच एक मनी आमच्या पैकी कोणालाच हात लाऊ देत नसे पण  ती झोपल्यावर मात्र हात लाऊ देत असे . आम्ही तिला असच झोपल्यावर हात लाऊन लाऊन तिला माणसांची सवय लावली मग पुढे चालून ती जागे पाणी देखील आमच्या जवळ येवू  लागली. 
     व्यंग काही फक्त माणसातच असतात अस नाही (शारीरिक व्यंग ) ते मांजरात देखील असतात. माझ्या वडिलांनी एक मांजर आमच्या शेतातून आणली होती .ती चालताना पाय हावेत टाकून चालायल्या सारखी चालायची नंतर आमच्या लक्ष्यात आल की ती अंध होती आणि शेतात राहिल्या  मुळे ती फक्त कारळ(सूर्यफुलाच्या  बिया )खात असे .
            एकदा आम्ही आमच्या एका मनीला आंघोळ घातली . तर ती जरासाही विलंब न लावता लगेच मातीत लोळायला  गेली .तसं करण्यामागच तीच कारण देखील होत थंड पाण्यान ती पार गारठून गेली होती . नंतर मात्र कधीच आम्ही कुठल्या मांजराला आंघोळ घातली नाही .
   तर हे अस आहे मांजराच आणि आमच्या कुटुंबाच नात . तुम्ही म्हणाल की एवढ्या सगळ्या मांजरांचे  मी फक्त किस्से सांगितले पण फोटो मात्र एका ही मांजराचा टाकला   नाही. त्याच काय आहे मी बाकी कुठल्या अंधश्रद्धा  पाळत नाही पण एक अंधश्रद्धा मात्र पाळतो मी मांजराचे फोटो काढत नाही आणि काढलेच तर ते प्रसिद्ध करत नाही अलीकडेच मी एका मनीचा फोटो मोबाईल मध्ये काढला तर ती पळून गेली . आम्ही  अगदी ५ -६ दिवसापूर्वीच एक खारुताई सारख्या रंगाचे मांजराचे  एक गोंडस  पिल्लू  पाळले आहे  ज्याला कोणीही बोलवण्याची गरज लागत नाही ते आपोआप जी व्यक्ती समोर दिसेल त्याच्या मांडीवर जाऊन बसते .ही मनी अजून तरी घराच्या बाहेर देखील गेली नाही म्हणून लाडाने मी तीच नाव 'ओसामा' ठेवल  आहे .
  तर कसा वाटला हा माझा वाघोबाच्या  मावशी सोबतचा (आणि काका सोबतचाही) प्रवास प्रतिसादाची वाट पाहतोय .
                                                                                         
  
 






















     

शनिवार 7 मे 2011

Breaking News

नमस्ते , तुम्ही म्हणाल की मी ब्लॉग मराठीतून लिहितोय पण शीर्षक इंग्रजीत का ?
सवयीचा परिणाम बाकी काय कारण 'ब्रेंकिंग न्यूज ' या शब्दाला अजुन तरी मराठी प्रतिशब्द सापडला नाही.
.(मराठी वृत्त वाहिन्यांना सुद्धा ) तसा आपण चेष्टेने त्याला मोडक्या तोडक्या बातम्या म्हणतो ते सोडा .
 असो , मी माझ्या पहिल्याच ब्लॉगला हे नाव द्यायचं कारण ही तसच आहे . कारण  मी      BREAKING NEWS हा शब्द मी पहिल्यांदा पहिला तो ११ सप्टेबर २००१ रोजी रात्री साडे दहा च्या दरम्यान त्या वेळेस आमच्या कडे केबल  नसल्यान मी  माझे  वडील व भावासोबत  दूरदर्शन वर एक Detective मालिका पाहत होतो . तेव्हा मधेच मालिका थांबवून WTC (World Tread Center) वर  झालेला हल्ला CNN मार्फत दूरदर्शन वर दाखवला जात होता .त्या वेळेस मी फक्त ११ वर्षाचा आसल्यान व मराठी माध्यमाचा विद्यार्थी आसल्यान मला WORLD TREAD  CENTER , TWINS TOWER  काही माहीत नव्हत. मला तेव्हा फक्त एक गोष्ट समजली की काहीतरी भयंकर घडल्यावर (म्हणजे फार मोठा हल्ला किवा दुर्घटना ) घडल्या नंतर ती बातमी 'ब्रेंकिंग न्यूज' या मथळ्याखाली दाखवतात .त्या नंतर काही दिवस मी  BREAKING NEWS पहिल्या नंतर थोडीशी भीतीच वाटायची पण काही वर्षांनी परिस्तिथी बदलली   NEWS CHANNELS चा जसा काही पूर आला . आणि NEWS  CHANNELS  वर काय दाखवाव आणि काय नाही याला काही अर्थ उरला नाही .आता कोणतीही टुकार बातमी देखील BREAKING NEWS  म्हणून दाखवली जाते .आणि ज्याला NEWS  CHANNEL म्हणतात तिथे ज्योतिष ,वेगवेगळ्या रुद्राक्ष्याच्या शनी रक्श्या कवचाच्या जाहिराती आणि टार्रोकार्ड ज्योतिष  असल  काहीतरी भलतेच दाखवलं जात
एखादी बातमी किती खेचावी आणि किती वेळा तेच तेच दाखवाव हे यांच्याकडून शिकावं. आणि एखादी घटना घडली की जगात दुसर काहीच घडल नाही अस दाखवल जात उदा . एखाद्या बाबांचा मृत्य झाला की त्यांचा जन्म कुठ झाला ,त्याचे celebrity भक्त आणि त्यांचे तथाकथित चमत्कार एखादा मोठा क्रिकेटर त्यांच्या समोर बसून कसा रडतो . हे सगळ दाखवल  जात . ओसामा कसा मेला हे अमेरिकेन फक्त काही पत्रकानद्वारे सांगितले त्याची कुठली video क्लीप सोडा साधा फोटो देखील नाही .तर हे न्यूज channel वाले स्वतःच्या मनाचे मनोरे रचून त्याच घर कस आहे , त्याच्या डोक्यात गोळी कशी लागली हे creative imagination द्वारे दाखवत आहेत मराठी वृत्त वाहिन्या याला थोड्या फार प्रमाणात अपवाद आहेत 
बाकी  आता रजा  घेतो IPL चा सामना पहायचा  आहे प्रतिक्रियांची वाट पाहतोय .