नमस्ते , आज ब्लॉग कोणत्या विषयावर लिहावा हा विचार करत असताना मला अचानक माझा अत्यंत आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय आठवला तो म्हणजे 'वाघोबाची मावशी ' अर्थात मांजर .मांजर हा आमच्या घराचा अविभाज्य घटक आहे .मी जन्मल्यापासून तर मांजर आमच्या घरात आहेच पण त्याही आधी २० वर्ष म्हणजे जवळपास गेली ४० वर्ष मांजर माझ्या वडिलांचा आवडता पाळीव प्राणी असल्या कारणाने सतत आमच्या घरात आहे
आता पर्यंत कितीतरी मांजर आली आणि गेली पण आमच्याकडच्या मांजराचे नाव कधीही बदलले नाही जर मांजरी असेल तर 'मनी' आणि बोका असेल तर 'बोक्या'. मी माझ्या आई आणि वडिलांकडून ऐकलेले (माझा जन्म होण्या आधीचे ) मांजराचे काही किस्से सुरवातीला लिहितोय .एक मांजर अस होत जे माझे वडील ऑफिस मधून आले की टुणकन त्यांच्या खांद्यावर उडी घेत असे. आणि विशेष म्हणजे हे मांजर माझ्या वडिलांच्याच ताटात एका बाजूला काढून ठेवलेला भात किवा चपातीचा तुकडा खात असे आणि माझी आई दररोज त्याला बास्केट मध्ये ठेऊन फिरून आणत
. आता मी पाहीलेल्या पहिल्या मांजराबद्दल ते मांजर थोडस विचित्रच होत ते आश्या साठी की तेंव्हा मी दीड -दोन वर्षाचा असेन मी टीव्ही पाहत बसलेला असताना (टीव्ही पाहण्याची आवड मला लहानपणापासून आहे हे यावरून दिसत ) ते मांजर अचानक मागून येऊन त्याच्या पुढच्या दोन पायाने माझ्या मानेला धरून मला मागे डोक्यावर पाडत असे (ही अतिशयोक्ती वाटत असली तरी हे खर आहे ) आणि हे मांजर सश्या सोबत चक्क खेळत असे . पुढे माझ्या वडिलांची दुसऱ्या गावाला बदली झाली आणि ते मांजर तिथेच राहीले
. नंतर ही आम्ही अनेक मांजर पाळली आणि त्यांना पिल्ले देखील झाली . त्यातल्याच एका पिल्लाला लहान असताना पहिले काही महिने मागच्या दोन पायावर चालता येत नसे पण नंतर काही दिवसांनी कोणत्याही विलाजाशिवाय ते मांजर व्यवस्थित चारही पायावर चालू लागले .त्याच्या आईच्या चाटन्यानेच बहुतेक ते बरे झाले आसवे
आणखी एका बोक्याचा अतिशय मजेदार अनुभव आहे . तो बोक्या मी पहिलीत असताना आमच्या घरी होता मी तीन चाकी सायकल वर बसून शाळेत जात असे आणि माझी आई मला शाळेत सोडायला यायची तर माझ्या आई सोबत तो बोक्या देखील मला शाळेत सोडायला यायचा तो माझ्या सायकल समोर गडबडा लोळत येत असे आणि मला शाळेत सोडल्यावर माझ्या आई सोबत माघारी येत असे . एकदा हा बोकोबा काही माघारी माझ्या आई सोबत आलाच नाही . मग जेव्हा माझी आई मला शाळेतून माघारी नेण्यासाठी आली तेव्हा हा बोक्या बरोबर माझ्या शाळेच्या दारात बसला होता व तो पुन्हा माघारी घरी आला.
ह्या बोक्याच आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे हा बोक्या त्याच्या आईच्या अनुपास्तितीत आपल्या धाकट्या भावंडांची अगदी आई सारखी काळजी घेत असे .
आमच्या मनीला झालेल्या पिल्लांपैकी बरीच पिल्ले आम्ही आमच्या ओळखीच्या लोकांना देखील दिली त्यातलंच एक पिल्लू आम्ही माझ्या वडिलांच्या ऑफिस मधील सहकार्याला दिले .त्याला त्यांनी अगदी थाटात सांभाळले .त्याच्यासाठी त्यांनी थर्माकोलच छोटस घर देखील बनवल मला अजूनही आठवतंय त्यांनी तीच नामकरण 'रुबी' अस केल ती मनी थाटात नक्की राहायची पण मांसाहारी पदार्थ खाण तर सोडा ती त्याकडे पाहत देखील नसे .
सगळीच मांजर काही माणसांच्या सवयीची नसतात अशीच एक मनी आमच्या पैकी कोणालाच हात लाऊ देत नसे पण ती झोपल्यावर मात्र हात लाऊ देत असे . आम्ही तिला असच झोपल्यावर हात लाऊन लाऊन तिला माणसांची सवय लावली मग पुढे चालून ती जागे पाणी देखील आमच्या जवळ येवू लागली.
व्यंग काही फक्त माणसातच असतात अस नाही (शारीरिक व्यंग ) ते मांजरात देखील असतात. माझ्या वडिलांनी एक मांजर आमच्या शेतातून आणली होती .ती चालताना पाय हावेत टाकून चालायल्या सारखी चालायची नंतर आमच्या लक्ष्यात आल की ती अंध होती आणि शेतात राहिल्या मुळे ती फक्त कारळ(सूर्यफुलाच्या बिया )खात असे .
एकदा आम्ही आमच्या एका मनीला आंघोळ घातली . तर ती जरासाही विलंब न लावता लगेच मातीत लोळायला गेली .तसं करण्यामागच तीच कारण देखील होत थंड पाण्यान ती पार गारठून गेली होती . नंतर मात्र कधीच आम्ही कुठल्या मांजराला आंघोळ घातली नाही .
तर हे अस आहे मांजराच आणि आमच्या कुटुंबाच नात . तुम्ही म्हणाल की एवढ्या सगळ्या मांजरांचे मी फक्त किस्से सांगितले पण फोटो मात्र एका ही मांजराचा टाकला नाही. त्याच काय आहे मी बाकी कुठल्या अंधश्रद्धा पाळत नाही पण एक अंधश्रद्धा मात्र पाळतो मी मांजराचे फोटो काढत नाही आणि काढलेच तर ते प्रसिद्ध करत नाही अलीकडेच मी एका मनीचा फोटो मोबाईल मध्ये काढला तर ती पळून गेली . आम्ही अगदी ५ -६ दिवसापूर्वीच एक खारुताई सारख्या रंगाचे मांजराचे एक गोंडस पिल्लू पाळले आहे ज्याला कोणीही बोलवण्याची गरज लागत नाही ते आपोआप जी व्यक्ती समोर दिसेल त्याच्या मांडीवर जाऊन बसते .ही मनी अजून तरी घराच्या बाहेर देखील गेली नाही म्हणून लाडाने मी तीच नाव 'ओसामा' ठेवल आहे .
तर कसा वाटला हा माझा वाघोबाच्या मावशी सोबतचा (आणि काका सोबतचाही) प्रवास प्रतिसादाची वाट पाहतोय .