शनिवार, ७ मे, २०११

Breaking News तुम्ही म्हणाल की माझा लेख मराठीतून आहे  पण शिर्षक  इंग्रजीत का ?
सवयीचा परिणाम बाकी काय कारण 'ब्रेंकिंग न्यूज ' या शब्दाला अजुन तरी मराठी प्रतिशब्द सापडला नाही
.(मराठी वृत्त वाहिन्यांना सुद्धा ).
 माहिती  तंत्र द्यनच्य विकासासोबतच ९० च्या दशकात केबल टीवी देखील घराघरात पोहचले. पहिल्यांदा केवळ मनोरंजनापर्यंत  मर्यादित  असणाऱ्या या केबल टीवी वाहिन्यात १९९६ पासून भर पडली ती वृत्त वाहिन्यांची. आधी बातम्या पाहण्यासाठी संध्याकाळी ७ वाजण्याची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांना आता २४ तास असणाऱ्या वृत्त वाहिन्यांचा पर्याय मिळाला
   मी    ब्रेकींग न्यूज    हा शब्द मी पहिल्यांदा पहिला तो ११ सप्टेबर २००१ रोजी रात्री साडे दहा च्या दरम्यान दूरदर्शन वर (त्या वेळी  २-३ वृत्त वाहिन्या  सुरु होत्या पण केबल कनेक्शन नसल्यामुळे मला काही ब्रेकींग न्यूज हा शब्द माहित नवता ) .  World Tread Center वर  झालेला हल्ला CNN मार्फत दूरदर्शन वर दाखवला जात होता .त्या वेळेस मी फक्त ११ वर्षाचा  व मराठी माध्यमाचा विद्यार्थी आसल्यान मला WORLD TREAD  CENTER , TWINS TOWER  काही माहीत नव्हत. मला तेव्हा फक्त एक गोष्ट समजली की काहीतरी भयंकर घडल्यावर (म्हणजे फार मोठा हल्ला किवा दुर्घटना ) घडल्या नंतर ती बातमी 'ब्रेंकिंग न्यूज' या मथळ्याखाली दाखवतात .त्या नंतर काही दिवस मी   'ब्रेंकिंग न्यूज'हे शब्द पहिल्या नंतर थोडीशी भीतीच वाटायची पण काही वर्षांनी परिस्तिथी बदलली   वृत्त वाहिन्यानचा जसा काही पूर आला . आणि त्यावर  काय दाखवाव आणि काय नाही याला काही अर्थ उरला नाही. बातम्यांचा बाबतीत बोलायचं तर बॉलीवूड आणि क्रिकेट या गोष्टी भारतात धर्माप्रमाणे मानल्या जातात हे या वृत्त वाहिन्यांना चांगलाच कळाल आहे .  त्यामुळच चित्रपट आणि क्रिकेटला या वाहिन्या अति महत्व देतात.आमक्या हिरोइनच तमक्या हिरो बरोबर असलेल अफेयर देखील या वाहिन्यांसाठी   ब्रेकींग न्यूज   असते . याचा या फिल्म स्टार्सना  त्यांच्या चित्रपटांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी फायदा होतो. चित्रपट निर्माते या वृत्त वाहिन्यांना त्यांच्या चित्रपटांचा प्रचार करण्यासाठी Media partner करून घेतात त्याचा वृत्त वाहिन्यांना   दुहेरी आर्थिक फायदा मिळतो एक तर निर्मात्यांकडून आणि  जाहिरातींच्या माध्यमातून देखील . फिल्म स्टार्सना   त्यांच्या वयक्तिक आयुष्यात प्रसार माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळ नुकसान देखील होत. हीच गोष्ट क्रिकेट च्या बाबतीत पण  थोड्या फार प्रमाणात लागू होते जो पर्यंत भारतीय टीम सामने जिंकत असते तो पर्यंत लोक त्यांना डोक्यावर घेतात आणि एखादी मोठी मालिका गमावली की क्रिकेटपटू प्रशानसाकांच्या रोषाला सामोर जाव लागत .२००७ चा क्रिकेट विश्वचषक हे त्याच उत्तम उदाहरणं . माजी खेळाडूना मात्र या वृत्त वाहिन्यांचा चांगलाच फायदा झालाय निवृत्ती नंतर आधी त्यांच्या कडे समालोचक किवा प्रशिक्षक असे दोनच पर्याय होते आता मात्र क्रिकेट तज्ञ हा नवीन पर्याय त्यांच्यासमोर खुला झालाय आणि तो आधीच्या दोन पर्यायांपेक्षा थोडा सोपा पण आहे क्रिकेट तज्ञ होण्यासाठी प्रत्यक्षात मैदानात खेळण्यासाठी उतरव लागत नसल्याने त्यांना खरया अर्थान क्रिकेट तज्ञ असण्याची गरज नसते फक्त १ किवा २  आंतरराष्ट्रीय सामने  खेळलेले  खेळाडू पण क्रिकेट तज्ञ म्हणून दिसतात. ज्या खेळाडूंवर Match fixing सारख्या गुन्ह्यांमुळे आजीवन बंदी आहे आश्या लोकांसाठी या वृत्त वाहिन्या पुनर्वसनाच काम करतात आणि त्यांच्या देखील पोटापाण्याची  सोय होऊन जाते .
 दूरदर्शन च्या बातम्यांमध्ये पूर्वी जाहिरात नावाचा काही प्रकार नसे पण आजच्या इतक प्रगत तंत्राद्यान नसल्याने कधी कधी त्यांमध्ये  व्यत्यय मात्र यायचा त्याचा देखील लोकांना खूप राग येत असे .  मात्र वृत्त वाहिन्यांनी   commercial breaks या गोष्टीची सुरुवात केली आणि जाहिरातींसाठी नवीन आणि परिणामकारक माध्यम खुल झाल. ज्या जाहिराती इतर मनोरंजन वाहिन्यांवर दाखवल्या जातात त्या तर इथ असतातच पण वृत्त वाहिन्यांनी एका नवीन जाहिरात प्रकारची सुरवात केली त्या म्हणजे वेगवेगळ्या रुद्राक्ष्याच्या शनी  कवचाच्या जाहिराती.एका बाजूला बातम्यांच्या बाबतीत जनतेला तत्पर ठेवण्याचा दावा करणाऱ्या या वाहिन्यांनी दुसरीकडे  अंधश्रद्धा पसरवणे किती योग्य आहे ?
   संवेदनशील माहिती दाखवताना या वाहिन्यांनी केलेल्या आतेतायी पणामुळे २००८ च्या मुंबई आतंकवादी हल्यामध्ये लोकांमध्ये दहशतीच वातावरण तर निर्माण झालाच पण आतंकवाद्यांना  पोलिसांच्या कारवाईची  पूर्वकल्पना पण आली आणि अनेक पोलिस अधिकारी शहीद झाले. राजकीय विश्लेषण हा या वाहिन्यांचा आणखीन एक हातखंडा हिंदी वृत्त वाहिन्यांवर ज्या राजकीय चर्चा असतात ती फक्त एक औपचारिकताच असते कारण त्यातून काही निष्फळ होत नाहीच फक्त प्रेक्षक संख्या वाढवून व्यावसायिक फायदा वाढवण्यासाठी या चर्चा असतात मराठी वाहिन्यांवर देखील याचा परिणाम दिसतो पण हिंदी वाहिन्यान इतका नाही .
     पण याच वृत्त वाहिन्यांची एक सकारात्मक बाजू देखील आहे . २४ तास चालणाऱ्या या वृत्त वाहिन्यांचा प्रसार देखील खूप आहे प्रत्येक शहरात त्यांचा किमान एक प्रतिनिधी तरी असतोच त्यामुळे गल्ली पासून दिल्ली पर्यंतचे सगळे घोटाळे उघड होतात आणि सरकारला कारवाई (किवा कारवाईची दिखावा )  करावीच लागते . अलीकडच्या काळात जनप्रक्षोभ सरकार पर्यंत पोह्चाविन्याच देखील या वाहिन्या एक उत्तम माध्यम बनल्या आहेत मग ते अण्णा हजारे याचं आंदोलन असो वा दिल्ली मध्ये झालेली बलात्काराची घटना असो . या दोन्ही घटनांमध्ये सरकारला नाविलजाने का होईना लोकांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे योग्य पावले उचलावीच लागली जर वृत्त वाहिन्या नसत्या तर कदाचित  हे शक्य   झाल नसत.  नुकतच दिल्ली मध्ये सत्तारूढ झालेलं  एक सरकार हे जन आंदोलनातून पुढ आलेल्या बिगर राजकीय लोकांनी स्थापन केलेलं सरकार आहे आणि वृत्त वाहिन्यांनी त्यांना घरोघरी पोहोचवण्यात खूप हातभार लावला .
       एक गोष्ट मात्र नक्की  की जसा भारत देश परिवर्तनाला समोर जातोय तश्याच या वृत्त वाहिन्या पण परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि काही वर्षाने परिस्थिती नक्की   बदलेल आणि वृत्त   वाहिन्या   या  BBC आणि इतर  आंतरराष्ट्रीय वाहिन्यांप्रमाणे काम करतील अशी अपेक्षा करूयात

                                        

२ टिप्पण्या: